Thursday, August 30, 2018

Shri Yogeshwari Devi Ambajogai

॥श्री॥


श्री योगेश्वरी देवीची माहिती  :-
समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले अंबाजोगाई शहर ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे. अंबेजोगाई मधे  योगेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. शिवाय खोलेश्वर, मुकुंदराज आणि दासोपंत सारखी इतर मंदिर आहेत.
पण अाज आपण श्री योगेश्वरी देवीची माहिती पाहणार आहोत.
श्री योगेश्वरी ही अंबानगरीचे एक भूषण आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपरयातून तिच्या दर्शनासाठी यात्रेकरूंची सारखी रीघ लागलेली असते.येगेश्वरी ही सर्वांचीच देवता असली तरी विशेषतः कोकणस्थ लोकांची ती कुलस्वामिनी आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, गोवा इत्यादी दूरदूरच्या ठिकाणाहून कोकणस्थ कुटुंबे भक्तिभावाने तिचे दर्शनास येत असतात. महाराष्ट्रात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, सप्तशृंगी ही देवीची मुख्यपीठे आणि अनेक उपपिठे असली तरी अंबेच्या नावाने प्रसिद्ध असलेली अंबाजोगाई हे एकच एक शक्तिपीठ अस्तित्वात आहे. अंबाजोगाई शहराला जसे अंबेचे शक्तिपीठ असण्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचप्रमाणे योगेश्वरी देवीला देखील इतर ठिकाणांच्या देवीपेक्षा एक खास वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे, देवीच्या भक्तीचे व्रत घेणारांना ( आराधी होणारांना ) परडी आणि पोत यांचा व्रतांचे प्रमुख चिन्ह म्हणून स्वीकार करावा लागतो. त्यातले त्यात परडी त्यांचा ट्रेंडमार्कच होऊन बसते. योगेश्वरी देवीने आपल्या हातात जी निरनिराळी आयुधे धारण केली आहेत, त्यात तिने एका हातात पत्र (परडी) धारण केल्याचा उल्लेख रुद्र्यामलखंडातील देवीच्या स्तवनाचे श्लोकात दिला आहे.

इतर शक्तीपिठाच्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही देवीच्या हातात तिच्या भक्तांनी स्वीकार केलेले हे आयुध (पात्र) दिसून येत नाही. योगेश्वरी देवीचे हे एक वैशिष्ट्य मुद्दाम उल्लेख करण्यासारखे आहे. योग साधनेत मग्न असलेल्या या देवीने हे चिन्ह धारण करणे योग्यच आहे आणि भक्तांनी सुद्धा आपले आयुष्य अशाच प्रकारे योग साधनेत घालवावे असा त्यांचा उद्देश असावा.

योगेश्वरी मंदिराचे प्रवेश द्वार :-
ऐकून दोन प्रवेश द्वार आहेत.
१.पुर्वेकडे

२.उत्तरेकडे

पार्किंगची सोय ही मंदिराचा पाठिमागे केलेली आहे.
श्री योगेश्वरी मंदिराकडे येन्याचा मार्ग :-
सर्वात जवळच्या रेल्वे स्थानक घटनावंदूर (18 किमी) परंतू ह्या ठिकानावरुन वहातूक सकाळी ६ ते रात्री ९ आशी आहे. परळी व नागनाथ (25 किमी) ह्या ठिकानावरुन वहातूक सोयिसकर आहे. आणि लातूर रेल्वे स्टेशन (50 किमी) आहेत. औरंगाबाद, परभणी, पुणे, जळगाव, लातूर, हैदराबाद इ. मार्गावर एमएसआरटीसी बस सेवा हिर्कनी आणि एसी शिवशाही बस.या बससेवा पुरवितात .

राहण्याची सोय :-
मंदिराच्या समोरील बाजूस व मागील बाजूस आहे.
१.समोरील बाजू

२.मागील बाजूस :-
श्री अंबाजोगाई भक्त निवास पुणे










फोटो :-






No comments:

Post a Comment